fbpx
Master Courses • Pure Learning

FAQs

प्रोग्राम ऑर्डर, डाउनलोड करणे

पेमेंट केल्यानंतर पेमेंट ची रिसीट आपल्या ईमेल आय डी वर लगेच पाठवली जाते. त्यावर सर्वात वर कोर्स डाउनलोड करण्याची लिंक असेल. तिथून आपण कोर्स फाईल्स डाउनलोड करू  शकता.

प्रत्येक लर्निंग प्रोग्रामची एकत्रित डाउनलोड साइज साधारण 1.3 GB  ते  2.0 GB पर्यन्त आहे मात्र या फाइल्स साधारणपणे 175 ते 200 MB या साइज मध्ये विभागलेल्या आहेत. त्यामुळे सर्व फाइल्स एकाच वेळी डाउनलोड करणे शक्य नसेल तर आपल्या सवडीप्रमाणे आणि उपलब्ध डाउनलोड क्षमतेप्रमाणे आपण या सर्व फाईल्स टप्प्या टप्प्याने कधीही डाउनलोड करू शकता. डाउनलोड लिंक्स कधीही एक्सपायर होणार नाहीत. 

स्वयम् लर्न प्रोग्राम सोबत कोणतेही सॉफ्टवेअर दिले जात नाही.

प्रोग्राम ऍक्टिवेट करणे आणि वापरणे

स्वयम् लर्न कोर्सेस Windows 10, Windows 8 अथवा  Windows 7  या ऑपरेटिंग सिस्टीम्स (32 किंवा 64 बीट) असलेल्या कॉम्प्युटर मध्ये वापरता येतील.  Windows XP या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये स्वयम् लर्न प्रोग्राम्स वापरता येणार नाहीत. 

स्वयम् लर्न कोर्सेस अँन्ड्रॉईड फोन, अँन्ड्रॉईड टॅब्स, लिनक्स कॉम्प्युटर, ऍपल डिव्हाईस मध्ये वापरता येणार नाहीत.  

स्वयम् लर्न प्रोग्राम मधील व्हिडीओ लेसन्स एन्क्रिप्टेड फॉरमॅट मध्ये आहेत. ते VLC Media Player, Windows Media Player किंवा यासारख्या कोणत्याही प्लेअर मध्ये पाहता येणार नाहीत. त्यासाठी विशेष मिडिया प्लेअर उपलब्ध करण्यात आला आहे. हा प्लेअर स्वयम् लर्न प्रोग्राम फाईल्स सोबत डाऊनलोड करून इन्स्टॉल करायचा आहे. 

नक्कीच. आपण सर्व कोर्स फाईल्सचा बॅकअप पेन ड्राईव्ह मध्ये, एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह मध्ये अथवा डीव्हीडी मध्ये सेव्ह करून ठेऊ शकता. कॉम्प्युटर फॉरमॅट केल्यानंतर, नवीन कॉम्प्युटर खरेदी केल्यानंतर त्या बॅकअप फाईल्स आपण परत इन्स्टॉल करू शकता.

ज्या कॉम्प्युटर मध्ये स्वयम् लर्न प्रोग्राम ऍक्टिवेट केला आहे त्या एकाच कॉम्प्युटर मध्ये वापरता येईल. दुसऱ्या कॉम्प्युटर साठी नवीन प्रोग्राम विकत घ्यावा लागेल.  

दुरुस्त केलेल्या कॉम्प्युटर मध्ये / नवीन खरेदी केलेल्या कॉम्प्युटर मध्ये लर्निंग प्रोग्रॅम इंस्टॉल करून पुन्हा एकदा ऍक्टिवेट करून घ्यावा लागेल. रिऍक्टिवेशन साठी कोणतेही शुल्क लागणार नाही.   

कोर्स मध्ये सांगितलेल्या सर्व एक्सर्साइजेस आणि प्रोजेक्ट्स पूर्ण करून स्वयम् लर्न कडे सबमिट केल्यानंतर PDF सर्टिफिकेट ईमेल वर पाठवण्यात येईल. सर्टिफिकेशन साठी आमचा कोणत्याही संस्थेशी सहयोग नाही. सर्टिफिकेट स्वयम् लर्न कडून दिले जाईल.

आपल्या प्रश्नांचे उत्तर इथे मिळाले नाही?
आम्हाला विचारा...