fbpx
Master Courses • Pure Learning

महाराष्ट्रात पुणे- मुंबई-नागपूर सारखी महानगरे, जिल्हा-तालुक्यांच्या शहरांपासून ते अगदी लहान लहान गावात सुद्धा ऍडव्हरटायजिंग, ग्राफिक डिझानिंग, प्रिंटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, व्हिडीओ प्रॉडक्शन या क्षेत्रांत हजारो व्यावसायिक काम करत आहेत. या सर्वांना कुशल डिझायनर्सची कमतरता नेहमीच जाणवत असते. दुसऱ्या बाजूला या क्षेत्रातील कुशल डिझायनर्स/ कर्मचारीसुद्धा चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. पण आज महाराष्ट्रात डिझायनिंग क्षेत्रात व्यवसाय करणारे आणि नोकरीच्या शोधात असलेले कुशल कर्मचारी याना एकत्र आणणारे समर्पित व्यावसायिक माध्यम अस्तित्वात नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी आम्ही ‘फक्त ग्राफिक डिझायनिंग, प्रिंटिंग, व्हिडीओ एडिटिंग या क्षेत्रांतील नोकरीविषयक जाहिराती’ हा उपक्रम सुरू करत आहोत.

target-audiance

दररोज एक लाख लोकांपर्यंत पोचणारी जाहिरात सेवा.
डिझायनिंग क्षेत्रातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तींपर्यंत या जाहिराती पोचवण्यासाठी आम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच पार्टनर ऍड नेटवर्क वरील ‘पेड जाहिराती (Sponsored Post) चा वापर करणार आहोत. या माध्यमातून दररोज कमीतकमी एक लाख लोकांपर्यंत या जाहिराती पोचतील. सुरुवातीला आम्ही ही जाहिरात सेवा पूर्णपणे निःशुल्क उपलब्ध करून देत आहोत. भविष्यात ही सेवा माफक शुल्कात उपलब्ध असेल.

target

टार्गेटेड जाहिराती, अपेक्षित परिणाम
या जाहिराती फक्त आणि फक्त ग्राफिक डिझायनिंग, advertising, पब्लिशिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, व्हिडीओ प्रॉडक्शन या क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना दाखवल्या जातील. यामुळे व्यावसायिकांना कुशल डिझायनर्स पर्यंत पोचणे आणि डिझायनर्सना नोकरीच्या संधी उपलब्ध होणे या दोन्ही बाबी सोप्या होतील.

Publish Your Job Openings For Free

Photoshop | CorelDraw | Illustrator | InDesign | Premiere Pro | Final Cut Pro | After Effects 

announcement

कृपया खालील मुद्द्यांच्या आधारे आपली जाहिरात मराठी अथवा इंग्रजीमध्ये लिहून आम्हाला व्हाट्सअप मेसेजद्वारे पाठवा.

  • जॉब टायटल (उदा. Photoshop artist, Graphic designer, Video editor)
  • जॉब लोकेशन (उपनगर, गाव, तालुका, जिल्हा, उदा. कोथरूड-पुणे, पंढरपूर-जि. सोलापूर)
  • वर्क फ्रॉम होम (ऑनलाईन जॉब) की ऑफिस वर्क 
  • कामाचे स्वरूप (उदा. Social media graphics, branding, Offset printing, Web, Flex etc.)
  • आवश्यक कौशल्ये (उदा. Photoshop, CorelDraw, Premiere Pro etc.)
  • अपेक्षित अनुभव 
  • देऊ करत असलेला पगार
  • आपले स्वतःचे (जाहिरातदाराचे नाव)
  • आपल्या फर्मचे नाव
  • आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स ज्यावर लोक संपर्क करू शकतील (Phone number/ WhatsApp/ Email ID etc.)

जाहिरातीचा नमुना:
शिवाजी नगर पुणे येथे दोन ग्राफिक डिझायनर्सची आवश्यकता आहे. कामाचे स्वरूप: ब्रोशर, फ्लायर्स, ब्रॅण्डिंग, होर्डिंग डिझायनिंग, सोशल मीडिया मार्केटिंग ग्राफिक ग्राफिक डिझायनिंग इत्यादी. आवश्यक कौशल्ये: फोटोशॉप, कोरल ड्रॉ, इलस्ट्रेटर. कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. अपेक्षित पगार: 20,000 प्रतिमहा. कृपया आपला रिझ्युम आणि पोर्टफोलिओ PDF फॉरमॅट मध्ये [email protected] वर ईमेल करा.  

Example of advertisement draft:
We are hiring two graphic designers. Location: Shivaji Nagar, Pune. Job description: Designing brochures, flyers, branding, hoarding and social media marketing graphics etc. Skills required: Photoshop, CorelDraw, Illustrator. Minimum experience required: 2 years. Salary offered: Rs. 20,000 per month. Please send your resume with portfolio in PDF format to [email protected]

आपली नोकरीविषयक जाहिरात आमच्या वेबसाईटवर निःशुल्क प्रसिद्ध केली जाईल. जाहिरातीचा प्रदर्शन कालावधी एक महिना असेल. अर्थात प्रसिद्ध केल्यापासून एक महिना आपली जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध असेल. फक्त ग्राफिक डिझायनिंग, व्हिडीओ एडिटिंग, VFX क्षेत्रातील नोकरीविषयक जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. आपली जाहिरात आपण जशी दिली आहे तशीच प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात वाचून इच्छुक व्यक्ती आमच्या मध्यस्थीशिवाय परस्पर आपल्याशी संपर्क साधतील. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांची कोणतीही माहिती आमच्याकडे संग्रहित नसते, त्यांनी स्वतःविषयी दिलेली माहिती, त्यांची पार्श्वभूमी, कामाचा अनुभव, कौशल्ये याची आम्ही कोणत्याही प्रकारे चौकशी किंवा खातरजमा करत नाही याची कृपया नोंद घ्यावी. नोकरीसाठी योग्य उमेदवारांची निवड करणे, नोकरीविषयक अटी-शर्ती, करार, आर्थिक व्यवहार, उमेदवारांचे वर्तन यांची संपूर्ण जबाबदारी जाहिरात देणाऱ्यांची/ नोकरी देणाऱ्यांची राहील याची कृपया नोंद घ्यावी. 

खाली बटनवर क्लिक करा, व्हाट्सअप मध्ये आपली जाहिरात टाईप करा आणि आम्हाला पाठवा. आमचा फोन नंबर आहे 9689912250. आपली जाहिरात दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध केली जाईल.