Copyright 2023 All rights reserved | Designed by SwayamLearn
वर्डप्रेस बिझनेस वेबसाईट डिझायनिंगचे प्रोफेशनल ट्रेनिंग देऊन नवीन व्यावसायिक घडवणे, या क्षेत्रातील नोकरीसाठी सक्षम कर्मचारी तयार करणे हा या कोर्सचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी वर्डप्रेस बिझनेस वेबसाईट डिझायनिंगचे व्यवसायाभिमुख, सखोल ट्रेनिंग देणे, तसेच ट्रेनिंग दरम्यान आणि कोर्सनंतरही त्यांच्या अडचणी सोडवणे या प्रमुख बाबींचा अंतर्भाव कोर्समध्ये केला गेला आहे.
वेबसाईट डिझायनिंग प्रोफेशनल बनणे ही एक दोन तासाचा ऑनलाईन वर्कशॉप करून किंवा व्हिडिओ ट्युटोरियल पाहून होणारी प्रक्रिया नाही. वेब डिझायनिंग हे मोठे व्यापक क्षेत्र आहे. त्यामध्ये अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीस, त्यांचे प्लॅटफॉर्म्स, त्यांची स्वतंत्र परिभाषा याचा समावेश आहे. सोबत वेबसाईटची आकर्षकता, उपयुक्तता आणि सुरक्षितता या बाबी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. या सर्वांची व्याप्ती समजून घेण्यासाठी आणि आवश्यक कौशल्ये शिकण्यासाठी किमान दोन आठवड्यांचा कालावधी देणे आवश्यक आहे. याचबरोबर भरपूर सराव करणे आणि काही खरेखुरे प्रोजेक्ट्स पूर्ण करणे सुद्धा आवश्यक आहे. या सर्व बाबींची पूर्तता या कोर्समध्ये होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश आहे.
नवीन टेक्नॉलॉजी शिकत असताना अनेक अडचणी येतात, मनात अनेक प्रश्न असतात. त्यांची वेळेत सोडवणूक झाली नाही तर नोकरी मिळवण्यासाठी अथवा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास कमी होतो आणि पुढचा मार्ग खुंटतो. असे होऊ नये यासाठी अनुभवी मार्गदर्शक सोबत असणे आवश्यक असते. हा कोर्स करत असताना क्लास सेशनमध्ये विद्यार्थी आपल्या शंका विचारू शकतीलच मात्र क्लास संपल्यानंतर प्रॅक्टिस आणि ट्रेनिंग प्रोजेक्ट्स करताना आलेल्या अडचणी सुद्धा विद्यार्थी फोन, व्हाट्सअप मेसेजद्वारे विचारू शकतात. आलेल्या अडचणींची सोडवणूक व्हाट्सअप मेसेजेस द्वारे केली जाईल. प्रसंगी TeamViewer, Anydesk द्वारे विद्यार्थ्यांच्या कॉम्प्युटरचा रिमोट ऍक्सेस घेऊन सुद्धा अडचणींची सोडवणूक केली जाईल. कोर्स पूर्ण झाल्यावर सुद्धा हा ऑनलाईन सपोर्ट तब्बल तीन महिने उपलब्ध असेल.
हा ऑनलाईन कोर्स Google Meet द्वारे घेण्यात येईल. दररोजच्या ऑनलाईन सेशनची व्हिडीओ रेकॉर्डिंग विद्यार्थी डाउनलोड करून ऑफलाईन पाहू शकतील. यामुळे कोर्समधील ट्रेनिंग मटेरियल विद्यार्थ्यांना हव्या त्या वेळी उपलब्ध होऊ शकेल.
स्वयम् लर्न चे संस्थापक आणि संचालक श्री सदानंद कुलकर्णी हे स्वतः लाईव्ह ट्रेनिंग देणार आहेत. ते 2004 पासून ग्राफिक, प्रोफेशनल व्हिडीओ, थ्रीडी डिझायनिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच 2010 पासून वेबसाईट डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात कार्यरत आहेत. आजवर त्यांनी 300 पेक्षा अधिक वेबसाईट्स डिझाईन केल्या आहेत. त्यांच्याविषयी अधिक माहिती इथे मिळेल.
लाईव्ह प्रोजेक्ट्सची, त्यांच्या पेज लेआऊटची सुस्पष्ट कल्पना यावी यासाठी खालील वेबसाईट्स कृपया लॅपटॉप अथवा डेस्कटॉप कॉम्प्युटरवर पाहा .
वर्डप्रेस वेबसाईट डिझायनिंग करण्यासाठी लॅपटॉप अथवा कॉम्प्युटर आवश्यक आहे. हे काम मोबाईल फोनवर करता येणार नाही. Intel i3, 4 GB Ram या किमान क्षमतेचा कॉम्प्युटर असावा.
Google Meet वरील ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी, आणि वेबसाईट डिझायनिंगसाठी आवश्यक असलेली सॉफ्टवेअर्स आणि इतर साहित्य डाउनलोड करण्यासाठी स्थिर इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे .
वर्डप्रेस वेबसाईट डिझायनिंग साठी कोणत्याही प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे अथवा विशिष्ट सॉफ्टवेअरचे ज्ञान आवश्यक नाही. तथापि सर्वसामान्य कॉम्प्युटर ऑपरेशन्स, इंटरनेट ब्राउजिंग, ईमेल्स यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
जगातील ४३ टक्के वेबसाईट वर्डप्रेस वापरून तयार केल्या गेल्या आहेत आणि ही संख्या वाढतीच आहे. वर्डप्रेस हे एक ओपन सोर्स आणि अर्थातच सर्वांसाठी ‘फ्री’ उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर आहे. वर्डप्रेस वापरून अनेक प्रतिष्ठित वेबसाईट बनवल्या गेल्या आहेत. यामध्ये Microsoft News, Sony Music, BBC America, Disney company, Harvard University, Facebook Newsroom, White House, Obama Foundation यांसारख्या लाखो वेबसाईटसचा समावेश आहे. ग्राफिक डिझायनिंगमध्ये जे स्थान फोटोशॉप, कोरल ड्रॉ, इलस्ट्रेटर यांचे आहे तेच सर्वोच्च स्थान वेब डिझायनिंग क्षेत्रात वर्डप्रेसचे आहे.
कोर्स करण्यासाठी आणि पुढे व्यवसाय करण्यासाठी लागणारी सर्व सॉफ्टवेअर आणि इतर रिसोर्सेस अधिकृतरित्या फ्री उपलब्ध आहेत. त्यांच्या डाउनलोड लिंक्स कोर्समध्ये दिल्या जातील. ही सर्व सॉफ्टवेअर्स ओपन सोर्स आणि अधिकृतपणे फ्री उपलब्ध असल्यामुळे कोणतेही सॉफ्टवेअर बेकायदेशीर पद्धतीने, क्रॅक करून, पायरसी करून वापरावे लागणार नाही. त्यामुळे आपण पूर्णपणे निर्धास्त होऊन कोर्स पूर्ण करू शकता आणि पुढे कायदेशीर मार्गाने व्यवसायही करू शकता.
वर्डप्रेस बिझनेस वेबसाईट डिझायनिंगसाठी कॉम्प्युटर कोडींग अथवा प्रोग्रामिंग लँग्वेज चे ज्ञान असण्याची गरज नाही. वर्डप्रेस वेबसाईट तयार करताना त्यासाठीचे कोडींग बॅकएंडला आपोआप तयार केले जाते. वर्डप्रेस वेब डिझायनरला फक्त आपली वेबसाईट सुविधायुक्त, आकर्षक आणि युजर फ्रेंडली कशी होईल या बाबींकडे लक्ष द्यायचे असते. यामुळे वर्डप्रेस वेबसाईट डिझायनिंग ही केवळ रुक्ष आणि कंटाळवाणी टेक्निकल प्रोसेस न होता कलेचा आणि निर्मितीचा आनंद देणारी क्रिएटिव्ह प्रोसेस बनते.
वर्डप्रेस बिझनेस वेबसाईट डिझायनिंग कोर्स करण्यासाठी आणि नंतर प्रॅक्टिस करण्यासाठी विद्यार्थ्यांना डॉट कॉम, डॉट इन यासारखे डोमेन नेम आणि सोबत वेबसाईट होस्टिंग सर्व्हिस विकत घ्यावी लागणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमध्येच लोकल सर्व्हर सेटअप करून वेबसाईट डिझाईन करायच्या आहेत. लोकल सर्व्हर सेटअपसाठी आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअरची फुल व्हर्जन कोर्स सुरु करतानाच विद्यार्थ्यांना दिली जाईल. या लोकल सर्व्हरमध्ये विद्यार्थी अनलिमिटेड वेबसाईट्स डिझाईन करू शकतील. हे सॉफ्टवेअर कधीही एक्स्पायर होणार नाही.
पारदर्शकता आणि परस्पर संवाद यांवर आमचा विश्वास आहे. कोर्स एनरोल करण्यापूर्वी आपल्या मनात काही प्रश्न, शंका असतील तर कृपया +91 9689912250 या नंबरवर फोन करा (सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत) अथवा व्हाट्सअप मेसेज करा.
आजवर हजारो बंधू भगिनींना ग्राफिक, डिझायनिंग, वेब डिझायनिंग क्षेत्रात नोकरी आणि व्यवसाय करण्यास लागणारे कौशल्य आणि आत्मविश्वास आम्ही देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आणि समाधान आहे.
श्री अजय पाटील
पुणे
फेब्रुवारी 2020 साली जॉईन केलेला वर्डप्रेस वेबसाईट डिझायनिंगचा ऑनलाईन कोर्स लॉकडाऊन च्या काळात खुपच चांगल्याप्रकारे शिकता आला. कोर्सचे संपूर्ण रेकॉर्डिंग मिळालेले असल्याने तो मी केंव्हाही ऑफलाईन बघू शकतो ही मला सर्वात भावलेली गोष्ट. सदानंद कुलकर्णी सरांची शिकवण्याची पद्धत खुपच सोपी असल्याने माझ्यासारख्या जेष्ठ नागरीकास शिकण्याचा नवा आनंद प्राप्त झाला. धन्यवाद कुलकर्णी सर!
श्री जीवन भुतेकर
जालना
स्वयम् लर्नचा वर्डप्रेस वेबसाईट डिझायनिंग आणि डिजिटल मार्केटिंगचा कोर्स मी २०२० केला आहे. महागडे क्लासेस लावून जे मला कदाचित शिकता आले नसते ते मी घरच्या घरी अगदी कमी फीस मध्ये शिकू शकलो. सरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोर्स संपल्यानंतरही मी त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला मिळाली. ते घाईत किंवा दुसऱ्या कामात असले तरी उशिरा का होईना पण रिप्लाय नक्की येतो असा माझा अनुभव आहे. क्लासच्या विषयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी मला मार्गदर्शन केले आहे. स्वयम् लर्न आणि कुलकर्णी सरांचे आभार.
श्री उमेश उघडे पंढरपूर
मी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक असून फोटोशॉप व ग्राफिक्स यात किमान आपल्या शाळेतील व आवश्यक तेवढे काम करता यावे म्हणून गेली 2 ते 3 वर्षा पासून फोटोशॉप व कोरल शिकण्याचा प्रयत्न करत होतो, पण बाहेर जाऊन शिकण्यासाठी वेळ मिळत नव्हता. इकडून तिकडून YouTube वरील व्हिडिओ पाहून शिकण्याचा प्रयत्न करत होतो पण बेसिक ते ऍडव्हान्स व टूल वाईज मातृभाषेत व्हिडिओ किंवा इतर माहिती उपलब्ध होत नव्हती. मला स्वयम् लर्न कोर्सेस विषयी माहिती मिळाली, वेबसाईट वरील सविस्तर माहिती पाहून मी लगेच फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ चा कोर्स जॉईन केला. आज मी माझ्या शैक्षणिक उपक्रमासाठी लागणारे सर्व डिझाईन वर्क सहजपणे तयार करतो. यामुळे विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने मी शिकवतो आहे. याचा विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होत आहे. आपल्या कार्यास शुभेच्छा. (श्री उमेश उघडे सर यांनी २०१६ साली कोर्स केला आहे)
सौ. योगेश्वरी अघोर
धाराशिव
डिझायनिंग क्षेत्राची मला पहिल्यापासून आवड होती मात्र या आवडीला व्यावसायिक स्वरूप देणे मला शक्य नव्हते कारण माझ्यासारख्या गृहिणीला सगळ्या व्यापातून वेळ काढून नवीन काहीतरी सुरु करणे अवघड असते. दरम्यान स्वयम् लर्न कोर्सेस विषयी माहिती मिळाली. कोर्सेस विषयी मला सुरुवातीला थोडी शंका होती, मला हे जमेल का? नीट शिकवतील का? शंकांचे समाधान होईल का? असे बरेच प्रश्न मला पडले होते. मात्र पहिल्या तीनचार दिवसातच याचा काहीतरी नक्की फायदा होईल हा आत्मविश्वास आला. कोर्स करताना आलेल्या अडचणींचे त्याचवेळी उत्तर मिळत गेले. कोर्स पूर्ण होऊन आता तीन वर्षे होत आली आहेत. सुरुवातील मी आमच्याच भागातील एका ग्राफिक डिझायनरचे छोटे-मोठे जॉब्स ‘वर्क फ्रॉम होम’ केले. आता मी एका जाहिरात एजन्सी मध्ये डिझायनिंग आणि DTP चे काम पूर्णवेळ करते आहे. पुढच्या दोन तीन वर्षात माझी स्वतःची छोटी जाहिरात एजन्सी सुरु करण्याचा माझा विचार आहे. (सौ. योगेश्वरी अघोर यांनी २०१५ साली कोर्स केला आहे.)
श्री श्रेणिक मिरजे
सांगली
समजून घेण्यास सहज आणि सोपे कोर्सेस. डीटेल्ड नॉलेज आणि अगदी माफक फीस. अवास्तव आश्वासने नाहीत की लपवाछपवी नाही. खुप छान अनुभव आला. धन्यवाद स्वयम् लर्न!
श्री श्याम भायेकर
नांदेड
गेल्या वीस वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे अनेक वेळा अनेक ठिकाणाहून मी एडिटिंग आणि डिझाईनिंग सॉफ्टवेअर शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु स्वयम् लर्न संस्थेसारखी शिकवण्याची अतिशय सोपी आणि सुटसुटीत पद्धत मी आजपर्यंत तरी पाहिलेली नाही. प्रोफेशन मध्ये जे करावे लागते नेमके तेच ट्रेनिंग आणि सोप्या, स्वच्छ भाषेत समजून सांगण्याची पद्धत ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आपण यांचा कुठलाही कोर्स निवडा एक वेळ तुम्ही तो कोर्स केल्यावर तुम्हाला इतरत्र कुठेही परत हा कोर्स करण्याची गरज भासणार नाही, कारण मी त्याचा अनुभव घेतलाय. श्री कुलकर्णी सरांनी आमच्यासारख्या व्यवसायिक लोकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण सुरू केले याला सध्या तरी तोड नाही. श्री कुलकर्णी सर कोर्स पूर्ण केल्यावरसुद्धा आपल्याला वेळोवेळी मदतही करतात.
श्री वल्लभ म्हाळस
संगमनेर जि. नगर
माझ्या सारखे अनेक विद्यार्थी असतील, ज्यांना सखोल पद्धतीने शिकायचे असते पण शिकवणारे आसपपास उपलब्ध नसतात, पण आमच्यासारख्यांचा हा खूप मोठा प्रश्न तुम्ही सहजपणे सोडवलात आणि ते सुद्धा एकदम माफक किमती मध्ये, हव्या त्या वेळात आणि समजले नाही तर पुन्हा पुन्हा पाहून शिकता येते. तरीही समजले नाही तर आम्ही विचारू शकतो. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळणार याचीही खात्री. जवळपास दीड ते पावणे दोन महिन्यात कोरल आणि फोटोशॉप पूर्णपणे शिकून आता मी इलस्ट्रेटर शिकायला सुरुवात करतोय… आयुष्यभरासाठी तुमचा ऋणी आहे सर…मनापासून धन्यवाद!
श्री पराग शेट्ये
लांजा जि. रत्नागिरी
मला महावितरण मध्ये चांगली नोकरी आहे पण मूळची कलाकारी वृत्ती… त्यामुळे ग्राफिक डिझाईनिंग शिकता येईल का? हे विचार डोक्यात घोळत होते पण कोकणासारख्या दुर्गम भागात चांगल्या कोर्सेसची सोय नसल्याने ग्राफिक डिझाईनिंग आवड असुनही शिकता येत नव्हते. फेसबुकवर स्वयम् लर्नची डिझायनिंग कोर्सेसची जाहीरात बघितली, वेबसाईट वरून आणि फोन वरून सगळी माहिती घेतली. खात्री पटताच लगेच फोटोशॉप, कोरल ड्रॉ आणि इलस्ट्रेटरचा कोर्स जॉईन केला. वेळ मिळेल तेंव्हा सराव केला. काही दिवसातच मला त्यातील बारकावे समजू लागले. मी आता मी फोटो अल्बम डिझाईनिंगची कामे घेतो. श्री सदानंद कुलकर्णी सर यांच्या सोप्या व समजेल अश्या शिकवण्याच्या पद्धतीमुळेच मी माझ्या रिकाम्या वेळेचे व छंदाचे रुपांतर व्यवसायात करु शकलो.
सौ. मनीषा श्याम घाटे, तळेगांव दशासर जि. अमरावती
माझ्या मिस्टरांचा कॉम्प्युटर आणि प्रिंटिंग व्यवसाय आहे. आमच्याकडे वेडिंग कार्डस्, विझिटिंग कार्डस्, ब्रोशर्स, बॅनर डिझाईन अशी कामे केली जातात परंतु यांचे डिझाईन आम्ही बाहेरून करून घेत होतो. यामुळे आम्हाला डिझाईन साठी वेगळे पैसे दयावे लागत होते. आपण स्वतः एखादा ग्राफिक्स डिझाईन कोर्स करावा अशी खूप दिवसांची इच्छा होती पण तेवढा वेळ मिळत नव्हता आणि आमचा ग्रामीण भाग असल्यामुळे बाहेरगावी कोर्स करायला जाणे परवडत नव्हते. एक दिवस फेसबुक वर स्वयम् लर्नची जाहिरात बघितली आणि सरांना कॉल केला. २०१८ मध्ये आम्ही स्वयम् लर्नचा फोटोशॉप आणि कोरल ड्रा कोर्स घेतला आणि काही दिवसांतच पूर्ण सुद्धा केला. श्री सदानंद कुलकर्णी सरांची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि सहज समजेल अशी आहे. मुख्य म्हणजे फी सुद्धा अगदी कमी आहे. या कोर्स मध्ये डिझायनिंग अगदी डीटेल्ड शिकवले असल्याने माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. आता आमच्या प्रिंटिंग व्यवसायासाठी लागणाऱ्या सगळ्या डिझाईन्स मी करते. यामुळे आमच्या व्यवसायाला खूप फायदा झाला. मी आता माझ्या मिस्टरांच्या व्यवसायात आत्मविश्वासाने मदत करते आहे.
Copyright 2023 All rights reserved | Designed by SwayamLearn