Copyright 2023 All rights reserved | Designed by SwayamLearn
प्रोफेशनल ग्राफिक डिझायनिंग सॉफ्टवेअर्सची तोंडओळख सुद्धा नाही असे विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेऊन या कोर्सेसची रचना करण्यात आली आहे. हे कोर्सेस टप्प्याटप्प्याने बेसिक पासून प्रोफेशनल लेव्हल पर्यंत आपल्याला घेऊन जाईल. डिजिटल इमेज एडिटिंग आणि ग्राफिक डिझायनिंगची जी कामे एका डिझाईन प्रोफेशनलला नोकरी किंवा व्यवसायात करावी लागतात ती जास्तीत जास्त कौशल्ये या कोर्स मध्ये अगदी सविस्तर शिकवली गेली आहेत. या डिझायनिंग अँप्लिकेशन्सचा वापर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात करणार असाल तरी, हे कोर्सेस केल्यानंतर पुन्हा कोणतेही वेगळे ट्रेनिंग घेण्याची आवश्यकता नाही.
कोर्स मटेरियल डाउनलोड करा आणि तुमच्या उपलब्ध वेळेत, स्वतःच्या गतीने आणि कधीही शिका. कॉम्पुटर इन्स्टिटयूट किंवा ऑनलाईन लाईव्ह क्लास प्रमाणे ठराविक वेळेतच जॉईन व्हा असे बंधन या कोर्सेस मध्ये नाही. त्यामुळे तुमचा व्यवसाय, नोकरी आणि इतर जाबदाऱ्या सांभाळून तुम्ही प्रोफेशनल ट्रेनिंग घेऊ शकता.
श्री सदानंद कुलकर्णी हे स्वयम् लर्नचे संचालक आणि प्रशिक्षक आहेत. ग्राफिक, मल्टिमीडिया, थ्री डी डिझायनिंग, प्रोफेशनल व्हिडीओ प्रॉडक्शन या क्षेत्रात साल 2000 पासून ते कार्यरत आहेत. अनेक भारतीय, बहुराष्ट्रीय कंपन्या, शासकीय विभाग आणि अनेक व्यावसायिकांना त्यांनी सेवा दिल्या आहेत. त्यांच्याविषयी अधिक माहिती About Us या पेजवर आहे.
कोर्स मध्ये केलेल्या एक्सरसाईजेस विद्यार्थ्यांना स्वयम् लर्न कडे सबमिट करायच्या आहेत. कोर्स मध्ये पूर्ण केलेल्या एक्सरसाईजेस यांच्या आधारे सर्टिफिकेट दिले जाते. सर्टिफिकेट ईमेल व्दारे पाठवले जाते.
दर्जेदार ट्रेनिंग आणि पर्सनल सपोर्ट देऊन विद्यार्थ्याना इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल बनवणे, नोकरी, व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि आत्मविश्वास देणे हा आमच्या कोर्सेसचा प्रमुख उद्देश आहे. 2012 पासून आजवर याच पद्धतीने आम्ही हजारो प्रोफेशनल्स घडवले आहेत. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात ते स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात काम करत आहेत.
श्री राजू जाचक
पुणे
स्वयम् लर्न चे ट्रेनिंग कोर्सेस अप्रतिम दर्जाचे आहेत. सरांचे अगदी, बेसिक स्तरापासूनचे, डिटेल्स प्रस्तुतिकरण खूपच उत्तम आहेत. मी इतरत्रही कोर्स ट्रेनिंग घेतले होते. परंतू सरांच्या शिकवणूकीत जो, आनंद आणि ज्ञान मिळते तसा अनुभव मला इतरत्र आला नाही. त्यामुळेच आज माझा आत्मविश्वास वाढला आहे त्यामुळेच मी स्वतंत्रपणे, सुलभतेने डिझायनिंग आणि एडिटींग करू शकत आहे. स्वयम् लर्न संस्थेचे आणि सरांचे खुप-खुप,धन्यवाद!
पारदर्शकता आणि परस्पर संवाद यांवर आमचा विश्वास आहे. कोर्स एनरोल करण्यापूर्वी आपल्या मनात काही प्रश्न, शंका असतील तर कृपया +91 9689912250 या नंबरवर फोन करा (सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत) अथवा व्हाट्सअप मेसेज करा.