Master Courses • Pure Learning

स्वयम् लर्न

आत्मविश्वास ज्ञानाचा, पासवर्ड यशाचा !

कल्पकतेला मूर्त रूप देता देईल असे प्रशिक्षण अनुभवी प्रोफेशनल्सच देऊ शकतात. स्वयम् लर्न प्रोग्राम्स याची संपूर्ण पूर्तता करतात.

2012 पासून... सर्वांसाठी, यशस्वी करिअरसाठी

प्रोफेशनल ट्रेनिंग, माफक फीस आणि अनुभवी प्रशिक्षक

ग्राफिक, डिझायनिंग आणि मल्टिमीडिया सॉफ्टवेअर्सच्या लर्निंग कोर्सेसच्या माध्यमातून स्वयम् लर्न 2012 पासून कार्यरत आहे. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन क्लास करण्याइतका वेळ आज बहुतेकांकडे नाही, कोर्सेसची फीस सुद्धा आवाक्याच्या बाहेरची असते आणि ग्रामीण भागात प्रोफेशनल ट्रेनिंगच्या सुविधा उपलब्ध नाहीत. शिकवणारी व्यक्ती अनुभवी प्रोफेशनल असेलच याचीही बऱ्याचदा खात्री नसते त्यामुळे मिळणाऱ्या ट्रेनिंगच्या दर्जाविषयीही साशंकता असते. या सर्व समस्यांचे उत्तर स्वयम् लर्न कोर्सेस मध्ये आहे. पुण्यामध्ये डिझायनिंग, मल्टिमीडिया, प्रोफेशनल व्हिडीओ प्रॉडक्शन क्षेत्रातील 20 वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेल्या प्रशिक्षकाकडून आपल्याला किफायतशीर फीस मध्ये प्रोफेशनल ट्रेनिंग घरच्या घरी मिळणार आहे.        

विचारपूर्वक डिझाईन केलेले कोर्सेस, भरपूर एक्सरसाईजेस, लाईव्ह प्रोजेक्ट्स आणि असाईनमेन्ट्स

2000 सालापासूनचा डिझायनिंग आणि मल्टिमीडिया क्षेत्रातील प्रदीर्घ व्यावसायिक अनुभव आणि 2012 पासूनचा ट्रेनिंग क्षेत्रातील अनुभव आमच्या पाठीशी आहे. स्वयम् लर्नचे हजारो विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रोफेशनल ट्रेनिंग देणारी आणि विद्यार्थ्यांना व्यक्तिगत पातळीवर सपोर्ट करणारी संस्था असा लौकिक स्वयम लर्न ने गेल्या अकरा वर्षांत प्राप्त केला आहे. डिझायनिंग क्षेत्रात नोकरी, व्यवसाय करण्यासाठी तसेच रोजगारक्षम बनण्यासाठी नक्की कोणत्या प्रकारचे कौशल्य आवश्यक आहे याची नेमकी जाण आम्हाला या प्रदीर्घ अनुभवाने दिली आहे. याच अनुभवाचा अंतर्भाव करून आम्ही स्वयम लर्न कोर्सेस डिझाईन केले आहेत. 

प्रशिक्षकांचा परिचय

सदानंद कुलकर्णी
● Dip in Civil Engineering
● Dip in Multimedia (CDAC/ Year 2000)
● Dip. in Journislm & Mass Comm (2004)
● Google Certification in Digital Marketing (2017)

श्री सदानंद कुलकर्णी यांनी “Architectural Visualizer” म्हणून आपल्या व्यवसायाची सुरुवात १९९७ साली केली. आर्किटेक्ट्स आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्स यांच्यासाठी ते फ्रीलान्सर म्हणून काम करत होते. २००० साली मल्टिमीडिया डिझायनिंगचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ग्राफिक डिझायनिंग, आर्किटेक्चरल थ्री डी मॉडेलिंग, थ्री डी ऍनिमेशन, प्रोफेशनल व्हिडीओ प्रॉडक्शन या क्षेत्रात व्यवसाय सुरु केला. ते 2010 पासून वेब डिझायनिंग आणि 2017 पासून डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या, व्यावसायिक संस्था, पुणे आणि महाराष्ट्रातील अर्किटेक्टस, बिल्डर्स, शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी त्यांनी काम केले आहे. यातील काही प्रमुख नांवे :  

● Cummins India Ltd.
● Atlas Copco
● Beck & Pollitzer
● Harbinger Group
● RBI’s College of Agricultural Banking, Pune
● Department of Agriculture, Maharashtra State
● MIT World Peace University

● Indian Railway’s Institute of Civil Engineering, Pune
● Maharashtra State Agricultural Marketing Board 
● Maharashtra Industrial Development Corporation (MIDC)
● Public Works Dept. (PWD)
● Dr. Jagannath Dixit’s Association for Diabetes and Obesity Reversal
● Greenville Maharashtra Mandal, Greenville USA 

सदानंद कुलकर्णी यांनी केलेल्या काही व्हिडिओ फिल्म्स

‘कमिन्स इन इंडिया’ साठी तयार केलेली व्हिडिओ क्लिप
विषय: फटाके मुक्त दीपावली 2019 
प्रसिद्धी माध्यम: व्हाट्स अप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक
संकल्पना, लेखन आणि एडिटिंग:  सदानंद कुलकर्णी
निवेदन: मीली श्रीवास्तव 

नाना पाटेकर यांचे ‘नाम फाउंडेशन’ आणि ‘ग्रीनथम्ब’ साठी केलेली व्हिडिओ फिल्म  
विषय: खडकवासला धरण पुनरुज्जीवन प्रकल्प 
प्रसिद्धी माध्यम: वेबसाईट, यूट्यूब आणि फेसबुक
संकल्पना, लेखन आणि एडिटिंग:  सदानंद कुलकर्णी
निवेदन: सचिन खेडेकर

कर्दळीवन पंचपरिक्रमा
प्रसिद्धी माध्यम: YouTube
संकल्पना: प्रा.क्षितिज पाटुकले
लेखन, चित्रीकरण आणि एडिटिंग:  सदानंद कुलकर्णी
निवेदन: विनया देसाई 

बुलावा ‘डेथझोन’ चा
(माउंट एव्हरेस्ट मोहिमेवर आधारित व्हिडीओ फिल्मचा ट्रेलर) 

संकल्पना, लेखन: श्रीधर पोतदार
एडिटिंग: सदानंद कुलकर्णी
निवेदन: डॉ. अमित त्रिभुवन 

खडकवासला धरण पुनरुज्जीवन प्रकल्प 
प्रसिद्धी माध्यम: Whatsapp, Facebook
संकल्पना: सदानंद कुलकर्णी
लेखन आणि एडिटिंग:  सदानंद कुलकर्णी
निवेदन: वृषाली पटवर्धन, अनिरुद्ध दडके 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे CAB पुणे 
प्रसिद्धी माध्यम: CAB Website
संकल्पना: व्ही. जी. सेकर 
व्हिडीओ आणि एडिटिंग:  सदानंद कुलकर्णी
निवेदन: डॉ. अमित त्रिभुवन

आजवर हजारो जणांना नवीन मार्ग दाखवणारे कोर्सेस...

आजवर हजारो बंधू भगिनींना ग्राफिक, डिझायनिंग आणि मल्टिमीडिया क्षेत्रात नोकरी आणि व्यवसाय करण्यास लागणारे कौशल्य आणि आत्मविश्वास आम्ही देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आणि समाधान आहे.

श्री निरंजन देसाई
कोल्हापूर

खूप अल्प खर्चात अतिशय सुंदर कोर्सेस आहेत, मी आपले 3 कोर्सेस पूर्ण केले आहेत, Photoshop ,CoralDraw आणि Illustrator. या तिन्ही कोर्सेसचा मला खूप फायदा झाला आणि जे शिकायचे होते त्यापेक्षा आणखी बरेच काही शिकायला मिळाले. 

प्रा. सत्यजित घोरपडे
इस्लामपूर जि. सांगली

अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये कार्यरत असताना मला एक आवड म्हणून ग्राफिक डिझाईन विषयी नेहमीच प्रचंड आकर्षण असायचे पण प्रयत्न करूनही यासंदर्भातील योग्य मार्गदर्शन मला मिळत नव्हते. एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून मला स्वयम् लर्न विषयी माहिती मिळाली मी तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधला आणि ग्राफिक्स डिझाईन संदर्भात असणाऱ्या लर्निंग कोर्स चा लाभ घेतला. मार्गदर्शनाचा हा अभिनव उपक्रम मला प्रचंड आवडला. केवळ स्वयम् लर्न मुळे माझ्यासाठी स्वप्नवत असणाऱ्या संकल्पनांना मूर्त स्वरूप प्राप्त झाले. स्वयम् लर्न परिवाराचा मी मनःपूर्वक ऋणी आहे.

श्री सार्थक बगाडे
मलकापूर, बुलढाणा

मलकापूर जि. बुलढाणा इथे बगाडे रेडियम आर्ट या नावाने आमचा व्यवसाय आहे. व्यवसायात उपयोग व्हावा म्हणून मी मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन काळात स्वयम् लर्न चा फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ चा कोर्स केला. याचा खरोखर आमच्या व्यवसायात मोठा उपयोग झाला आहे. पूर्वी आम्हाला डिझाईन वर्क बाहेरून करून घ्यावे लागायचे. आता आम्ही स्वतः आमचे डिझाइन्स बनवतो. श्री गजानन महाराजांचे फोटोज आणि म्युझिक व्हिडीओज मी तयार करत असतो त्यासाठीही मला कोर्सचा उपयोग झाला. पुणे मुंबईला न जाता मला घरच्या घरी प्रोफेशनल ट्रेनिंग दिल्याबद्दल धन्यवाद.

श्री आशय चव्हाण
बोरिवली मुंबई

मला स्वतःचा प्रिंटिंग व्यवसाय सुरु करायचा होता पण ग्राफिक डिझायनिंग विषयी मला फारशी माहिती नव्हती. स्वयम् लर्न कोर्सेस केल्यानंतर मी आता माझे डिझाइन्स मी स्वतः करत आहे. सरांचेही वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना मिळत गेल्या. ज्यांना डिझायनिंग क्षेत्रात यायचे आहे अशा सर्वांसाठी पहिली स्टेप म्हणून स्वयम् लर्न कोर्सेस नक्की उपयुक्त आहेत.

श्री संजय गोरले
बुलढाणा

मी फॅशन फोटोग्राफर आणि वेडिंग सिनेमॅटोग्राफर आहे. फेसबूक ब्राऊज करत असताना स्वयम् लर्न पुणे यांची जाहिरात मी बघितली वेबसाईटवर डिटेल्स पहिले, सरांशी फोनवर बोललो आणि खात्री पटली की आपल्याला इथे नक्की चांगले शिकायला मिळणार आहे. मी पहिला कोर्स फोटोशॉपचा केला आणि उत्तम अनुभव आल्यानंतर एक-एक करून कोरल ड्रॉ, प्रीमिअर प्रो, इलस्ट्रेटर हे कोर्सेस केले. लॉकडाऊनच्या काळात मी आता या सर्व सॉफ्टवेअर मध्ये एक्स्पर्ट झालो आहे. माझ्या बिजनेस मध्ये यांचा खूप उपयोग होत आहे. सरांच्या शिकण्यातली मधली एक वैशिष्टपुर्ण गोष्ट म्हणजे सरांची भाषा आणि शिकवण्याची पद्धत एवढी सहज आणि सोपी आहे की असं वाटते की सर आपल्या बाजूला बसून आपल्याला शिकवत आहेत.

आपले मत, सूचना आमच्यासाठी बहुमोल आहेत.