fbpx
Master Courses • Pure Learning

सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग ग्राफिकसाठी

फोटोशॉप डिझायनिंग

पहिला एक दिवस फ्री जॉईन करा

कोर्समधील पहिला एक दिवस कोणीही फ्री जॉईन करू शकतो. लाइव्ह कोर्स दरम्यान आपल्या शंका, प्रश्न विचारू शकतो. शिकवणे पसंद पडल्यानंतरच फीस भरून कोर्स सुरु ठेवू शकता.   

कोर्स जॉईन करण्यासाठी आवश्यक बाबी

फोटोशॉप हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वर चालणारे सॉफ्टवेअर आहे. मोबाईल फोन मध्ये फोटोशॉप वापरता येणार नाही. त्यामुळे कोर्स जॉईन करण्यासाठी आणि पुढे काम करण्यासाठी कॉम्पुटर अथवा लॅपटॉप असणे आणि त्यात फोटोशॉप इन्स्टॉल असणे आवश्यक आहे.  कोर्स ऑनलाईन असल्याने कॉम्पुटर/ लॅपटॉप मध्ये इंटरनेट सुरु असणे आवश्यक आहे.  

1-social-media-marketing-1

'सोशल मीडिया ग्राफिक डिझायनिंग' ऑनलाईन युगाची गरज

असं म्हणतात की एक पानभर शब्दांमधून जे सांगता येते ते फक्त एक चित्र किंवा विचारपूर्वक डिझाईन केलेलं एक ग्राफिक अधिक प्रभावीपणे सांगू शकते. सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंगच्या आजच्या या ऑनलाईन युगात याची प्रचिती आपल्याला हमखास येते. विविध क्षेत्रातील व्यावसायिक, डिजिटल मार्केटर तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची प्रभावी प्रतिमा निर्माण करू इच्छिणाऱ्यांसाठी आज ग्राफिक डिझायनिंग अत्यावश्यक बनले आहे. लोकांच्या सतत संपर्कात राहणे यासाठी कमीतकमी शब्दांत आणि आकर्षक ग्राफिक्सच्या प्रभावी पद्धतीने संवाद साधणे ही आता अनेकांची व्यावसायिक, राजकीय आणि सामाजिक गरज झाली आहे. अशा सर्वांसाठी आम्ही “सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग ग्राफिकसाठी फोटोशॉप डिझायनिंग” हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स विकसित केला आहे.   

नेमकी कौशल्ये शिकवणारा मराठीमधील कोर्स

प्रोफेशनल इमेज एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, पब्लिकेशन, फोटोग्राफी, वेब डिझायनिंग, UI डिझायनिंग, आर्किटेक्चरल डिझायनिंग अशा कितीतरी क्षेत्रांमध्ये फोटोशॉपचा वापर एक प्रमुख डिझायनिंग सॉफ्टवेअर म्हणून केला जातो. वेगवेगळ्या क्षेत्रांतील वेगवेगळ्या कामांसाठी फोटोशॉप मध्ये अनेक टूल्स आणि फीचर्स आहेत. एकच टूल वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या पद्धतींनी वापरले जाते. त्यामुळे सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग ग्राफिक डिझायनिंगचे मर्यादित काम डोळ्यासमोर ठेऊन फोटोशॉप शिकणारी व्यक्ती गोंधळून जाते. हे टाळण्यासाठी आम्ही सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग ग्राफिक डिझायनिंग हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा कोर्स डिझाईन केला आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी आवश्यक असलेली डिझाईनिंग कौशल्ये कमी वेळात, नेमकेपणे आणि मराठी मध्ये शिकता येणार आहेत.    

online-class

प्रदीर्घ व्यावसायिक अनुभव असलेले प्रशिक्षक

ग्राफिक डिझायनिंग, थ्री डी डिझायनिंग, मल्टिमीडिया डिझायनिंग आणि प्रोफेशनल व्हिडीओ प्रॉडक्शन या क्षेत्रातील वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले श्री सदानंद कुलकर्णी हे या कोर्सचे प्रशिक्षक आहेत. २०१८ साली त्यांनी डिजिटल मार्केटिंग मधील गुगल सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे. अनेक कंपन्या, संस्था याना ते आपली सेवा देत आहेत. डिझायनिंग क्षेत्रातील प्रदीर्घ व्यावसायिक अनुभव पाठीशी असलेला प्रशिक्षक स्वतः शिकवणार असल्याने प्रोफेशनल ट्रेनिंगची खात्री आहे. 

प्रशिक्षक श्री सदानंद कुलकर्णी यांच्याविषयी अधिक माहिती..

कोर्स मध्ये काय शिकवले जाणार?

  • फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्टाग्रामसाठी शुभेच्छा ग्राफिक डिझायनिंग 
  • युट्युब थंबनेल डिझायनिंग 
  • डिजिटल मार्केटिंगसाठी जाहिरातींचे डिझाईनिंग 
  • व्हाट्सअप साठी लग्नपत्रिका डिझायनिंग  

सोशल मीडिया/ डिजिटल मार्केटिंग ग्राफिक डिझायनिंगसाठी लागणाऱ्या टेम्प्लेट्स, डिझायनिंग एलिमेंट्स यांची मोठी लायब्ररी सुद्धा कोर्स सोबत फ्री दिली जाईल.

कोर्स जॉईन करण्यासाठी फोटोशॉप मध्ये काम करण्याचा पूर्वानुभव आवश्यक नाही.

कोर्सची सुरुवात अगदी बेसिक पासून केली जाते. यामध्ये फोटोशॉपची ओळख, त्यातील टूल्स आणि इंटरफेसची ओळख, फोटोशॉप मध्ये काम करण्याची पद्धत, डिजिटल इमेजचे कलर करेक्शन, रिटचिंग या बेसिक बाबींपासून कोर्स सुरु होतो. फोटोशॉपमध्ये काम करण्याचा अजिबात अनुभव नसलेले लोक नजरेसमोर ठेवून हा कोर्स तयार केला गेला आहे. त्यामुळे सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंगसाठी फोटोशॉप ग्राफिक्स डिझायनिंग शिकण्याची इच्छा आणि त्यासाठी लागणारी मेहनत घेण्याची तयारी एवढी एकच पात्रता या कोर्स साठी आवश्यक आहे.   

कोर्स मध्ये शिकवले जाणारे एक्सरसाईसेस

खाली दिलेल्या इमेजेस या प्रातिनिधिक नसून कोर्स मध्ये शिकवल्या जाणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना करावयाच्या प्रॅक्टिकलच्या इमेजेस आहेत.

वाढदिवस शुभेच्छा 

birthday banner design in marathi-1

वाढदिवस शुभेच्छा 

birthday banner design in marathi-2

वाढदिवस शुभेच्छा 

birthday banner design in marathi-3

फेस्टिवल शुभेच्छा 

birthday banner design in marathi-4

डिजिटल मार्केटिंग ग्राफिक 

Festival banner design in marathi-1

युट्युब थंबनेल डिझायनिंग 

व्हाट्सअप साठी विवाह निमंत्रण पत्रिका 

Whatsapp Wedding invitation

बर्थडे पार्टी इन्व्हिटेशन कार्ड  

Kid's birthday party invitation

डिजिटल मार्केटिंग ग्राफिक

Real-estate-ad-design

डिजिटल मार्केटिंग ग्राफिक

Advertisement designing

ऍडमिशन घ्या

: कोर्सचे नाव :
सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग ग्राफिकसाठी

फोटोशॉप डिझायनिंग

पहिला एक दिवस फ्री जॉईन करा

कोर्समधील पहिला एक दिवस कोणीही फ्री जॉईन करू शकतो. लाइव्ह कोर्स दरम्यान आपल्या शंका, प्रश्न विचारू शकतो. कोर्स उपयुक्त वाटल्यास आणि शिकवणे पसंद पडल्यानंतरच फीस भरून कोर्स सुरु ठेवू शकता.   

बॅचच्या वेळा

खालीलपैकी कोणत्याही एका बॅचला ऍडमिशन घेता येईल. 

सकाळी: 8.00 ते 9.00
संध्याकाळी: 6.00 ते 7.00
रात्री: 9.30 ते 10.30

कोर्स फीस: Rs 650

ऍडमिशन घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी कृपया व्हाट्सअप मेसेज  द्वारे 9689912250 या क्रमांकावर संपर्क साधा.