fbpx
Master Courses • Pure Learning

आपल्या फोटोग्राफी बिजनेसची ब्रोशर वेबसाईट आहे का?

आपली मॉडर्न, स्टायलिश आणि माहितीने परिपूर्ण ब्रोशर वेबसाईट तयार करा ...

फक्त १४५० रुपयांत!

केवळ एका लिंकमध्ये आपल्या फोटोग्राफी बिजनेसची सर्व माहिती जगासमोर प्रोफेशनल पद्धतीने सादर करा.

प्रथम ब्रोशर वेबसाईटचा डेमो पाहा.

ब्रोशर वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्या फोटोग्राफी व्यवसायाची माहिती तुम्ही ग्राहकांना किती नेमकेपणे आणि प्रभावीपणे सांगू शकता याचा अनुभव घेण्यासाठी खालील डेमो ब्रोशर वेबसाईट पाहा. फक्त १४५० रुपयात तुमचीही अशीच ब्रोशर वेबसाईट तुम्ही तयार करू शकता आणि त्याची लिंक आत्मविश्वासाने व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल माय बिजनेस, ईमेल अशा कोणत्याही ऑनलाईन माध्यमात शेअर करू शकता. तसेच तुमच्या प्रिंटेड व्हिजिटिंग कार्ड वर छापू शकता. 

ब्रोशर वेबसाईट कशासाठी?

सोशल मीडिया आणि ऑनलाईन मार्केटिंगच्या आजच्या युगात प्रेझेंटेशनला खूप महत्व आहे हे आपण जाणताच. विशेषतः फोटोग्राफी बिजनेससाठी हे तंतोतंत लागू पडते. नवीन ग्राहक जोडताना आपल्या व्यवसायाची प्रतिमा जास्तीत जास्त प्रभावी बनवण्याचा प्रयत्न फोटोग्राफी व्यावसायिक करत असतात. यासाठी अर्थातच आपली सर्व माहिती ग्राहकाला नेमकेपणाने, सूत्रबद्ध पद्धतीने आणि कमीतकमी वेळात द्यावी लागते. केलेले प्रोजेक्ट्स सुद्धा दाखवावे लागतात. हे काम बिजनेस वेबसाईट अतिशय प्रभावीपणे करू शकते. पण प्रोफेशनल बिजनेस वेबसाईट डिझाईन करून घेण्यासाठी सुरुवातीला कमीत-कमी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च करावे लागतात. पुढे प्रत्येक वर्षी डोमेन नेम रिनिवल, वेब होस्टिंग रिनिवल, अपडेट्स, सिक्युरिटी, मेंटेनन्स या बाबींवर किमान आठ ते दहा हजार रुपये खर्च करावे लागतात. सर्वच फोटोग्राफर्सना एवढा खर्च करणे शक्य नसते. अशावेळी आपण नवीन ग्राहकाला बहुतेक करून व्हाट्सअप मेसेजेस मधून केलेल्या कामांचे फोटो पाठवतो किंवा फेसबुक, इंस्टाग्राम पेजची लिंक देतो. पण यातून आपल्या व्यवसायाचे नेमके आणि प्रभावी चित्र ग्राहकाच्या मनात तयार होत नाही. आपल्याला आपल्या व्यवसायाविषयी नक्की काय-काय सांगायचे आहे हे सुद्धा त्यातून पुरेसे स्पष्ट होत नाही. नवीन ग्राहक जोडताना हे नक्कीच नुकसानकारक ठरू शकते. उत्तम व्यावसायिक अनुभव पाठीशी असताना, ग्राहकाला दर्जेदार सेवा देत असून सुद्धा अनेकांचे व्यवसाय एका ठराविक मर्यादेबाहेर वाढत नाहीत कारण त्यांनी त्यांच्या फोटोग्राफी व्यवसायाचे प्रमोशन आधुनिक पद्धतीने केलेले नसते. हे टाळण्यासाठी आम्ही खास फोटोग्राफी व्यावसायिकांसाठी घेऊन आलो आहोत ‘ब्रोशर वेबसाईट डिझायनिंग आणि पब्लिशिंग’ सेवा. यामध्ये आपल्याला प्रोफेशनल, स्टायलिश आणि मॉडर्न वेबसाईटचे फायदे अत्यल्प किमती मध्ये अर्थात फक्त १४५० रुपयांत मिळणार आहेत. 

आम्ही डिझाईन केलेल्या ब्रोशर वेबसाईटचे फायदे

अत्यल्प खर्च पण बिजनेस वेबसाईटचे फीचर्स

कोणत्याही मर्यादेशिवाय बिजनेसची सर्व माहिती ब्रोशर वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहकाला देता येईल. बिजनेस वेबसाईट प्रमाणेच ब्रोशर वेबसाईटमध्ये Home, About Us, Services, Gallery, Contact, Customer testimonials, Google Map, Youtube व्हिडीओज यांचा समावेश करता येतो. व्यवसायाच्या लोगोमध्ये जी रंगसंगती वापरली आहेत तेच कलर्स ब्रोशर वेबसाईट डिझाईन करताना वापरले जातील. यामुळे तुमच्या ब्रोशर वेबसाईट 'पर्सनल टच' मिळेल.

संपूर्ण प्रायव्हसी आणि आत्मविश्वास

तुमच्या ब्रोशर वेबसाईटमध्ये फक्त तीच माहिती असेल, जी तुम्हाला इतरांना सांगायची आहे. फ्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स प्रमाणे स्पर्धक व्यवसायाच्या जाहिराती, भलत्याच व्यवसायांचे प्रमोशन, लक्ष विचलित करणाऱ्या अनावश्यक लिंक्स तिथे नसतील. आम्ही डिझाईन केलेली तुमची ब्रोशर वेबसाईट फक्त तुमचीच असेल, जी तुम्ही कोणाहीसोबत आत्मविश्वासाने आणि निर्धास्त होऊन शेअर करू शकाल.

business-card.jpg
डिजिटल व्हिजिटिंग कार्डचे फीचर्स

ब्रोशर वेबसाईट मोबाईल फोन डिजिटल व्हिजिटिंग कार्डचेही काम करेल. यामध्ये फोन नंबर, व्हाट्सअप, ईमेल, एस एम एस, गुगल मॅप, सोशल मीडिया यांचे इंटिग्रेशन असेल.

सर्व कांही आमच्यावर सोपवा

तुमची ब्रोशर वेबसाईट डिझाईन करणे, ती ऑनलाईन सदैव उपलब्ध असणे ही पूर्णतः आमची जबाबदारी आहे. त्यामुळे सिक्युरिटी, मेंटेनन्स, अपडेट्स यासाठी तुम्हाला काहीही करावे लागणार नाही.

"ब्रोशर वेबसाईट" म्हणजेच वेळ आणि पैशांची बचत.

फक्त 1450 रुपयांत ऑल इन वन पॅकेज !

डोमेन नेम ( उदा: डॉट कॉम, डॉट इन, डॉट नेट) विकत घेण्यासाठी तुम्हाला दरवर्षी 700 ते 1200 रुपये खर्च करावे लागणार नाहीत कारण तुमची ब्रोशर वेबसाईट आम्ही आमच्या e-brochure.in या डोमेन नेम अंतर्गत पब्लिश करणार आहोत. 

प्रोफेशनल, स्टायलिश वेबसाईट डिझाईन करण्यासाठी तुम्हाला 5,000 ते 10,000 रुपये खर्च करावे लागणार नाहीत, कारण तुमची ‘मॉडर्न लुकिंग’ ब्रोशर वेबसाईट आम्ही डिझाईन करणार आहोत.   

वेबसाईटचा टेक्स्ट कन्टेन्ट (लिखित मजकूर) लिहिण्यासाठी तुम्हाला कन्टेन्ट रायटर ला 2,000 ते 4,000 रुपये द्यावे लागणार नाहीत, कारण तुमच्या ब्रोशर वेबसाईट साठी आवश्यक असलेला टेक्स्ट कन्टेन्ट आम्ही लिहिणार आहोत. 

वेब होस्टिंगसाठी दरवर्षी तुम्हाला 5,000 ते 7,000 रुपये खर्च करावे लागणार नाहीत कारण तुमची ब्रोशर वेबसाईट आम्ही आमच्या सर्व्हरवर पब्लिश करणार आहोत.  

वेबसाईट अपडेट करणे, हॅकर्स पासून वेबसाईट सुरक्षित ठेवणे याची चिंता तुम्हाला करण्याची आणि त्यासाठी आणखी वेगळा खर्च करण्याची आवश्यकता नाही कारण तुमची ब्रोशर वेबसाईट सदैव ऑनलाईन उपलब्ध असेल, सुरक्षित असेल ही आमची जबाबदारी आहे.    

लक्षात ठेवण्यास आणि शेअर करण्यास सोपी लिंक. समजा तुमच्या व्यवसायाचे नाव 'व्हिजन स्टुडिओ' असे असेल तर तुमच्या ब्रोशर वेबसाईटची लिंक
e-brochure.in/vision-studio
अशी सुटसुटीत आणि लक्षात ठेवण्यास सोपी असेल.

Premium Features

Rs 1450

For the first year
Renews at Rs 750 next each year

फक्त दोन स्टेप्स पूर्ण करा आणि आपली ब्रोशर वेबसाईट पब्लिश करा!

ब्रोशर वेबसाईट तयार करण्यासाठी तुमचा कमीत कमी वेळ खर्च व्हावा यासाठी याचा जास्तीत जास्त भार आम्ही आम्ही स्वीकारला आहे. तुम्हाला फक्त तुमच्या व्यवसायाची आवश्यक माहिती आणि गॅलरीसाठी फोटोज, युट्युब व्हिडीओजच्या लिंक्स आम्हाला द्यायच्या आहेत. ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी आम्ही एक गुगल फॉर्म खाली दिला आहे. तो भरून सबमिट केला आणि 1450 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले की तुमची जबाबदारी संपली. त्यानंतर आम्ही पुढील तीन दिवसांत (रविवार आणि प्रमुख सुट्ट्या वगळून) आपली  ब्रोशर वेबसाईट आम्ही तयार करून पब्लिश करू.  

महत्वाच्या सूचना

  • 1450 रुपये हे शुल्क पहिल्या एक वर्षासाठी आहे. ब्रोशर वेबसाईट पुढील प्रत्येक वर्षी कंटिन्यू  करण्यासाठी 750 रुपये रिनिवल चार्जेस आहेत.
  • या शुल्कामध्ये एक वर्षात चार अपडेट्स (टेक्स्ट इन्फॉर्मशन, फोटोज, व्हिडीओ लिंक्स, ऍड्रेस, अपडेट करणे) समाविष्ट आहेत. एका वर्षात चारपेक्षा अधिक अपडेट हवे असतील तर त्याचे वेगळे चार्जेस लागू होतील. 

ब्रोशर वेबसाईट तयार करण्यासाठी तुम्हाला ही पूर्वतयारी करायची आहे. 

  • तुमच्या फोटोग्राफी बिजनेसचा लोगो असेल तर त्याची स्पष्ट इमेज अपलोड करण्यासाठी तयार ठेवा.
  • आपला स्वतःचा एक आकर्षक फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. हा फोटो About Us सेक्शन मध्ये वापरला जाणार आहे. हा फोटो तयार ठेवा. 
  • गॅलरीसाठी हाय रिजोल्यूशन फोटोज आम्हाला पाठवायचे आहेत. गॅलरी साठी सर्व मिळून जास्तीत-जास्त 75 फोटोज तुम्ही पाठवू शकता. फोटोंची साईझ कमीत कमी 1920 X 1080 pixels असावी. फोटोजचे आवश्यक कलर करेक्शन केलेले असावे. त्यावर तुमचा वॉटरमार्क हवा असेल तर तोही त्यात इन्सर्ट करा. इमेजेस JPEG फॉरमॅट मध्ये असाव्यात. हे फोटोज तुम्हाला तुमच्या गुगल ड्राईव्ह वर सेव्ह करून ठेवायचे आहेत. त्याची लिंक खालील गुगल फॉर्म मध्ये द्यायची आहे. कृपया व्हाट्सअप द्वारे फोटोज पाठवू नये. व्हाट्सअप वर पाठवलेल्या इमेजेस कॉम्प्रेस केल्या जातात त्यामुळे त्यांची क्वालिटी कमी होते. इमेजेस केवळ गुगल ड्राईव्ह च्या माध्यमातून पाठवा. गुगल ड्राईव्ह मध्ये खालील प्रमाणे फोल्डर्स करून त्यात फोटोज सेव्ह करावेत.
  • सर्वात प्रथम गुगल ड्राईव्ह मध्ये एक मुख्य फोल्डर तयार करा त्याचे नाव तुम्ही Main folder, Uploads असे काहीही ठेवू शकता. 
  • वरील प्रमाणे तयार केलेल्या मुख्य फोल्डर मध्ये एक नवीन फोल्डर तयार करा. त्याचे नाव Header असे ठेवा. या फोल्डर मधील फोटोज हे ब्रोशर वेबसाईटच्या हेडरसाठी (सर्वात वर असलेल्या  सेक्शनमध्ये वापरले जातील. ब्रोशर वेबसाईटओपन केल्यानंतर सर्वप्रथम हे फोटोज दिसतील. ते अखंड स्क्रोल होत राहतील त्यामुळे सर्वात आकर्षक चार ते पाच फोटोज Header या फोल्डर मध्ये ठेवा. उदाहरणासाठी डेमो ब्रोशर वेबसाईट मधील सर्वात वरचा स्क्रोलिंग सेक्शन पाहा.
  • ब्रोशर वेबसाईटच्या गॅलरीमध्ये वेडिंग फोटोग्राफी, प्रि-वेडिंग फोटोग्राफी, फॅशन फोटोग्राफी, किड्स फोटोग्राफी असे सेक्शन्स असणार आहेत. तुमच्या ब्रोशर वेबसाईटच्या गॅलरीमध्ये  तुम्हाला जे सेक्शन्स हवे आहेत त्या-त्या नावांचे फोल्डर्स मुख्य फोल्डरमध्ये तयार करा उदा: Wedding, Pre-wedding, Fashion, Event. त्या प्रमाणे ते-ते फोटोज त्या फोल्डर्स मध्ये सेव्ह करा. गुगल ड्राईव्ह मध्ये तयार केलेल्या फोल्डर्सची रचना खालील प्रमाणे असावी. 

folder-structure

  • सर्वात प्रथम तयार केलेल्या मुख्य फोल्डरचा (Main Folder) ऍक्सेस शेअरेबल ठेवा. 
  • Customer Testimonials (ग्राहकांच्या प्रतिक्रिया) साठी चार ते सहा ग्राहकांच्या मोजक्या शब्दांतील प्रतिक्रिया आणि त्यांचे क्लोजअप फोटोज तयार ठेवा. उदाहरणासाठी डेमो ब्रोशर मधील Customer Testimonials हा सेक्शन पाहा. 
 

एवढी पूर्वतयारी झाल्यानंतर खालील दोन स्टेप्स पूर्ण करा. त्यानंतर तीन दिवसांत आपली  ब्रोशर वेबसाईट तयार करून आपल्यासोबत शेअर केले जाईल.   

Step-1

गुगल फॉर्म द्वारे आपल्या व्यवसायाची  माहिती द्या. 

गुगल फॉर्म मध्ये द्यावयाची माहिती तुम्ही मराठी किंवा इंग्रजी मध्ये तुमच्या शब्दांमध्ये देऊ शकता. आम्ही त्यावर योग्य प्रक्रिया करून घेऊ.  गुगल फॉर्म ओपन करण्यासाठी प्रथम Gmail मध्ये लॉगिन करावे लागेल.

Step-2

1450 रुपये ऑनलाईन पेमेंट करा. 

हे पहिल्या वर्षीचे शुल्क आहे. पुढील प्रत्येक वर्षीचे रिन्यूअल चार्जेस 750 रुपये आहेत. यामध्ये एका वर्षात चार वेळा अपडेट्स समाविष्ट आहेत. पेमेंट करण्यासाठी नेट बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड्स, मोबाईल पेमेंट्स वापरू शकता. 

आमच्या विषयी

ऑनलाईन ई-ब्रोशर्सची ही अभिनव सेवा आपल्यापर्यंत पुण्यातील डिजिटल कॅनव्हास या आमच्या डिझाईन स्टुडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. डिजिटल कॅनव्हास 2004 पासून ग्राफिक डिझायनिंग, थ्री डी व्हिज्युअलायजेशन, वेब डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, प्रोफेशनल व्हिडीओ प्रॉडक्शन, ई-लर्निंग अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. अनेक भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या, छोटे-मोठे व्यावसायिक, शासकीय संस्था यांच्यासाठी आम्ही सेवा देत आहोत. 2012 पासून आम्ही विकसित केलेल्या स्वयम् लर्न https://swayamlearn.com/ या  ई-लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राफिक डिझायनिंग, व्हिडीओ एडिटिंग, आर्किटेक्चरल थ्री डी डिझायनिंग अशा विविध कोर्सेसचे ऑनलाईन प्रशिक्षण देत आहोत. या माध्यमातून 2012 पासून आम्ही आजवर हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे आणि त्यांना रोजगारक्षम बनविले आहे. विविध क्षेत्रातील ग्राहकांना डिझायनिंग सर्व्हिसेस देण्याचा प्रदीर्घ अनुभव आमच्या पाठीशी आहे. याच अनुभवाच्या बळावर आम्ही आपल्याला मॉडर्न, स्टायलिश प्रोफेशनल ब्रोशर वेबसाईट डिझायनिंग & पब्लिशिंग सर्व्हिसेसची खात्री देत आहोत.

आमचे काही मान्यवर ग्राहक

● Cummins India Foundation 
● Atlas Copco
● Beck & Pollitzer
● RBI’s College of Agricultural Banking, Pune (CAB)
● Department of Agriculture, Maharashtra State
● MIT World Peace University
● Storytel

● Indian Railway’s Institute of Civil Engineering, Pune (IRICEN)
● Maharashtra State Agricultural Marketing Board 
● Maharashtra Industrial Development Corporation (MIDC)
● Public Works Dept. (PWD)
● Dr. Jagannath Dixit’s Association for Diabetes and Obesity Reversal
● Greenville Maharashtra Mandal, Greenville USA 

संपर्क

DIGITAL CANVAS

506 Saptasur, DSK Vishwa, Dhayari Pune 411041

All Rights Reserved | e-brochure.in