डिजिटल मार्केटिंग, SEO गाईडलाईन्स, सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन, पे पर क्लिक असे शब्द प्रथमच ऐकले की कोणाचीही छाती दडपून जाऊ शकते. योग्य मार्गदर्शन आणि स्वतःचे नेमके प्रयत्न यांच्या आधारे हे तंत्र सहज आत्मसात करता येते.
महाराष्ट्रात इंटरनेटवर राज्य करणारी भाषा कोणती? महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी संपर्कमाध्यम म्हणून कोणती भाषा वापरावी? इंग्रजी की मराठी? असा प्रश्न जर तुम्ही गुगलला विचाराल तर गुगलकडून निसंदिग्ध उत्तर मिळेल ‘मराठी’. गुगल असे का म्हणतो?